सुरेश धस यांच्याकडून गेवराई नगर परिषदेला ऑक्सिजन काॅन्सट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:02+5:302021-08-20T04:39:02+5:30
नगर परिषद ही ‘क’ दर्जाची नगर परिषद असूनदेखील ऐवढे विकासात्मक कामे आमदार लक्ष्मण पवार यांनी शहरात करून दाखविल्याबद्दल आमदार ...
नगर परिषद ही ‘क’ दर्जाची नगर परिषद असूनदेखील ऐवढे विकासात्मक कामे आमदार लक्ष्मण पवार यांनी शहरात करून दाखविल्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी आमदार पवारांच्या कामाचे कौतुक केले. नगर परिषदेचा कारभार पारदर्शकच आहे. त्यामुळेच नगरपालिकेचे मराठवाड्यात नाव आहे असे तोंड भरून कौतुक केले. यावेळी सुरेश धस यांनी नगर परिषदेला त्यांच्या फंडातून २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच ऑक्सिजन काॅन्सट्रेटरदेखील भेट दिले. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, दादासाहेब गिरी, राहुल खंडागळे, भगवान घुबार्डे, याहिया खाॅन, नगरसेवक काशीनाथ पवार, मंजूर बागवान, संजय इगळे, मुन्ना मोजम, धम्मपाल सौदरमल, किशोर धोडलकर, भरत गायकवाड, आप्पासाहेब कानगुडे, शेख फेरोज, कृष्णा काकडे आदी उपस्थित होते.
190821\sakharam shinde_img-20210819-wa0025_14.jpg