गती मंदावली, पण रॅँक टिकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:37 AM2019-09-17T00:37:21+5:302019-09-17T00:39:17+5:30
राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये
पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. दिवसभरात ४०९७ जणांनाच मत नोंदविता आले. तांत्रिक अडचणींमुळे ही गती मंदावली असून, येत्या काही दिवसात पुन्हा जोमाने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
११ सप्टेंबर रोजी ‘पाच मिनिटे बीड जिल्ह्यासाठी’ ही मोहीम राबविली होती. यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह सर्वच यंत्रणांचा सहभाग होता. त्यामुळे एकाच दिवशी ३८ हजार ग्रामस्थांनी स्वच्छतेविषयी मत मोबाईल अॅप व टोल फ्री क्रमांकाद्वारे नोंदविले होते. एका तासाला ३ हजार पेक्षा जास्त मतनोंदणीची गती राहिली. त्यामुळे राज्यात जिल्ह्याचा रॅँक १२ वरुन ३ वर स्थिरावला. त्यानंतर उमेदच्या माध्यमातून मत नोंदणीसाठी १६ सप्टेंबर रोजी नियोजन केले होते. मात्र ४०९७ जणांनीच मत नोंदविले.
आधी अडथळ्यांची सफाई व्हावी
राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्यासाठी अॅन्ड्रॉईड मोबाईलवर अॅप डाउनलोड करता येते. मात्र ज्यांच्याकडे असे मोबाईल नाहीत, त्यांना टोल फ्री क्रमांकाद्वारे मतनोंदणी करता येत होती. परंतू सदर टोल फ्री क्रमांक संपूर्ण देशासाठी एकच असल्याने त्याचा संपर्क होण्यात अनेक अडथळे आले. लाईन व्यस्त होती. एकापेक्षा जास्त टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध असती तर मत नोंदणीला गती मिळाली असती. त्याचबरोबर उत्साहाने मत नोंदणीसाठी सज्ज झालेल्यांचा हिरमोड झाला नसता.