पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:24+5:302021-09-19T04:35:24+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातून जाणाऱ्या पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला भेगा पडल्याचे समोर आले आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ...
बीड : पाटोदा तालुक्यातून जाणाऱ्या पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला भेगा पडल्याचे समोर आले आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याची तक्रार करत ठेकेदार व अभियंत्या विरोधात कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
पाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे काम तिरुपती कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेले आहे. या कामाबाबत तक्रारी, आंदोलन केले तरी यावर कसलीच कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आता आणखी डॉ. गणेश ढवळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून संंबंधित ठेकेदार, अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. ढवळे यांनी केली आहे, तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे हे लोकप्रतिनिधीही गप्पच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
180921\18_2_bed_19_18092021_14.jpeg
पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गावर अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत.