२२ जणांच्या बंदोबस्तामध्ये आणले पैठणचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:25 AM2019-04-06T00:25:48+5:302019-04-06T00:27:08+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.
सखाराम शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.
शहराला पाणीपुरवठा करणाºया शहागड येथील गोदावरी नदी पात्रातील बंधाºयातील पाणी गेल्या बारा दिवसा पुर्वी संपले होते.त्यामुळे शहरा बरोबर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागले होते. मात्र, नगर परिषदेच्या वतीने जायकवाडी धरण प्रकल्पाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याला यश आले.
रविवारी ५ द.ल.घ.मी पाणी पैठण येथून सोडले होते. ते पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडून तीन दिवसात बुधवार रोजी शहगड येथे पाणी पोहचले. मात्र हे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात उजव्या कालव्यावरील तब्बल ६० किलोमीटर अंतरावरून हे पाणी आले.
जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी शहागड बंधाºयात पोहचण्यासाठी व पाणी चोरी होऊ नये म्हणून उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या मोटारी काढून घेत पाणी बंधाºयात सोडण्यात आले.
या कामावर नगर परिषदेचे १२ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे ८ कर्मचारी तसेच २ पोलीस नियुक्त करण्यात आले होते.
२२ कर्मचाºयांच्या निगराणीमुळे त्यामुळे सर्व पाणी बंधाºयात पोहचत असून गेवराई शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरूवारपासून सुरळीत झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.