अंबाजोगाईमध्ये पळी-ताम्हण बजाव आंदोलन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:19+5:302021-01-22T04:30:19+5:30

अंबाजोगाई : ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी ...

Pali-Tamhan Bajav Andolan in Ambajogai - A | अंबाजोगाईमध्ये पळी-ताम्हण बजाव आंदोलन - A

अंबाजोगाईमध्ये पळी-ताम्हण बजाव आंदोलन - A

Next

अंबाजोगाई : ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पळी-ताम्हण बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘जय परशुराम’च्या गजराने परिसर दणाणून गेला. या आंदोलनाला आमदार नमिता मुंदडा, भाजप बीड उपाध्यक्ष सुनील लोमटे, राम कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक मनोज लखेरा, संजय गंभीरे, सुनील व्यवहारे, अंबादास गाढवे, शिवसंग्रामचे सुनील अडसूळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

यावेळी राहुल कुलकर्णी, महेश अकोलकर, हरिभाऊ माके, पद्माकर सेलमुकर, शिरीष हिरळकर, अक्षय पिंगळे, अक्षय देशमुख, श्रीकांत जोशी, वैभव देशपांडे, केदार दामोशन, सुमीत केजकर, रोहन जोशी, सर्वेश सेलुकर, वल्लभ पिंगळे, रोहन जोशी, आदित्य राखे, सुयोग विर्धे, दीपक कुलकर्णी, विनय चौसाळकर, कल्याणी कुलकर्णी, राजश्री पिंपळे यांच्यासह पेशवा संघटनेच्या महिला पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाने केलेल्या मागण्या रास्त असून, शासन दरबारी यासाठी प्रयत्न करेन. तसेच वेळप्रसंगी समाजासोबत मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरेन, असे नमिता मुंदडा यांनी सांगितले. ब्राह्मण समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक उन्नतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार करून एक हजार कोटींची तरतूद करावी, ब्राह्मण समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र शासकीय वसतिगृहे निर्माण करावीत, संपूर्ण शिक्षण मोफत करावे या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Pali-Tamhan Bajav Andolan in Ambajogai - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.