केज येथे ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पळी-ताम्हण बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:36+5:302021-01-20T04:33:36+5:30
ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास ...
ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळाला १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी , प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. केजीटुपीजी शिक्षण मोफत करण्यात यावे. समाजावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासारखा तत्सम कायदा करून कारवाई करण्यात यावी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या व अन्य मागण्यांसाठी केज तहसील कार्यालयासमोर पळी- ताम्हण वाजवून धरणे आंदोलनात करण्यात आहे.
धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, श्रीधर खोत, श्रीराम शेटे, अनंत कोकीळ, विश्वास शेटे, विजय क्षीरसागर, सुनील कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, प्रदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, पी. एस. लहुरीकर, व्यकंट पांडव, अतुल कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, उद्धव रामदासी आदी समाजबांधव सहभागी झाले होते.