पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:18+5:302021-04-20T04:35:18+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने ...

Panand roads should be repaired | पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी

पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी

Next

अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. याबाबत गांभीर्याने घेऊन रस्त्यासाठी पर्याय तयार करावा, अशी मागणी होत आहे.

बांधकाम साहित्य रस्त्यावरच

बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारी वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे

Web Title: Panand roads should be repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.