Rain in Beed: राक्षसभुवन येथील पांचाळेश्वर आणि शनी मंदिर पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:22 PM2021-09-05T12:22:56+5:302021-09-05T12:23:25+5:30

गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शनिच्या साडेतीन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या तालुक्यातील तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज  मंदिर पाण्याखाली गेले आहे.

Panchaleshwar and Shani temples at Rakshasabhuvan under water of flood of river in beed | Rain in Beed: राक्षसभुवन येथील पांचाळेश्वर आणि शनी मंदिर पाण्याखाली

Rain in Beed: राक्षसभुवन येथील पांचाळेश्वर आणि शनी मंदिर पाण्याखाली

googlenewsNext

- सखाराम शिंदे
गेवराई : गेल्या सोमवार रोजी तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले होते.त्या नंतर पुन्हा शनिवार 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास शहरा सह तालुक्यातील सर्वच भागात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने या झालेल्या पावसाने गोदावरी नदी कठी असलेल्या शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक मुख्य पिठ असलेल्या तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर व तिर्थक्षेत्र आत्मतिर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले असुन तसेच अमृता नदी,सिंदफना नदी,विद्रुपा नदी,कापशी सह इतर नद्या देखिल दुथडी भरून वाहत आहेत.

    तालुक्यातील गेल्या सोमवार रोजी अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकाचे व अनेक गावंचा संपर्क देखिल तुटला होता.त्या नंतर पुन्हा शनिवार 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास गेवराई शहरा सह तालुक्यातील विविध भागात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता.तो रविवार रोजी सकाळी 7 पर्यंत सुरू होता. परिणामी गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शनिच्या साडेतीन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या तालुक्यातील तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज  मंदिर पाण्याखाली गेले आहे. तसेच पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर देखिल पाण्याखाली गेले असल्याचे पांचाळेश्वर येथील महंत विजयराज गुर्जर बाबा व राक्षसभुवन येथील पुजारी सुनिल देवा चौथाईवाले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच तालुक्यातील सिंदफना नदी,कापशी नदी,अमृता नदी दुथडी भरून वाहत आहेत. तसेच तालुक्यातील नदी,नाले,ओढे सह अनेकांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहीले आहे.

Web Title: Panchaleshwar and Shani temples at Rakshasabhuvan under water of flood of river in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस