ग्रामीण भागात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:22+5:302021-05-21T04:35:22+5:30

धारूर : ग्रामीण भागात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीचे वतीने सहा पथके नेमून गावात जाऊन परिस्थितीचा ...

Panchayat Samiti's campaign to prevent corona outbreak in rural areas | ग्रामीण भागात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीची मोहीम

ग्रामीण भागात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीची मोहीम

googlenewsNext

धारूर : ग्रामीण भागात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीचे वतीने सहा पथके नेमून गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात असून उपाययोजना केली जात आहे. गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे हे स्वतः नियमित दररोज सात ग्रामपंचायतला भेट देत आहेत. यामुळे ग्रामीण भागात याचा परिणाम चांगला होत असल्याचे दिसत आहे.

धारूर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे हे दररोज सात ग्रापंला कोविड १९ संदर्भात प्रत्यक्ष भेट देतात व परिस्थितीची पाहणी करून उपाययोजाना केली जात आहे. नागरिकांत ग्रामपंचायतमार्फत जनजागृती केली जात असून पं. स. मार्फत एकूण ६ पथके स्थापन करण्यात आली आहेत. हे पथक प्रत्येकी ५ प्रमाणे ३० ग्रामपंचायतीला दररोज भेट देत असून गटविकास अधिकारी नियमित सात ग्रामपंचायतीला भेट देतात. अशी ३७ ग्रा. पं. ला रोज भेटी होत आहेत. लाॅकडाऊनची कडेकोट अमलबंजावणी बद्दल सूचना देऊन गावातील परीस्थितीची पाहणी करून इतर मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकात जनजागृती केली जाते. याचा परीणाम ग्रामीण भागात चांगला होत असून कोरोना प्रादूर्भाव रोखण्यास मदत होत आहे

===Photopath===

200521\anil mhajan_img-20210520-wa0047_14.jpg~200521\anil mhajan_img-20210520-wa0035_14.jpg

Web Title: Panchayat Samiti's campaign to prevent corona outbreak in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.