माजलगाव तालुक्यात पंचनाम्याला सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:34+5:302021-09-09T04:40:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

Panchnama has not started in Majalgaon taluka | माजलगाव तालुक्यात पंचनाम्याला सुरूवातच नाही

माजलगाव तालुक्यात पंचनाम्याला सुरूवातच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. माजलगाव तालुक्यात ८० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्यात आला होता. यात कापूस २५ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा २९ हजार हेक्टरवर पेरा करण्यात आला होता.

...

हातातोंडाचा घास हिरावला

काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगा पावसामुळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगा लागल्या असून, पावसामुळे सोयाबीन जमिनीवर लोळू लागले आहे. कापूसदेखील जमिनीवर पसरला आहे. ऊसाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी पुरुषोत्तमपुरी येथील शेतकरी गीताराम शिंदे यांनी केली आहे.

-----

दोन दिवसात पंचनाम्याला सुरूवात

दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात व शेतात चिखल असल्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. येत्या दोन दिवसात पंचनाम्याला सुरुवात केल्यानंतर नुकसानाचा अंदाज येईल.

- वैशाली पाटील, तहसीलदार.

080921\purusttam karva_img-20210908-wa0019_14.jpg~080921\purusttam karva_img-20210907-wa0090_14.jpg

Web Title: Panchnama has not started in Majalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.