धाकधूक वाढली; आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४३६ कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:43 PM2021-01-13T19:43:27+5:302021-01-13T19:43:37+5:30

आष्टी तालुक्यातील शिरापुर येथील चव्हाण व तागड वस्तीवर मृत कोंबड्या आढळल्या

The panic increased; 436 hens die at Shirapur in Ashti taluka | धाकधूक वाढली; आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४३६ कोंबड्यांचा मृत्यू

धाकधूक वाढली; आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४३६ कोंबड्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने नमुने तपासणीसाठी पाठवले

कडा ( बीड ) :  पाटोदा तालुक्यापाठोपाठ आष्टी तालुक्यात देखील बर्ड प्लुने शिरकाव केल्याची घटना घडली असताना मंगळवारी सायंकाळी शिरापुर येथे शेतातील ४३६ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून नमुने तपासणी पाठवले आहेत. 

आष्टी तालुक्यातील शिरापुर येथील चव्हाण व तागड वस्तीवर  मंगळवारी सायंकाळी अचानक बाबासाहेब चव्हाण, किरण तागड, भाऊसाहेब चव्हाण, झुंबर चव्हाण, पोपट तागड, संतोष तागड या सात शेतकऱ्यांच्या शिवारातील ४३६ कोंबड्या दगावल्या. याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक बुधवारी सकाळी गावात दाखल झाले. तोपर्यंत मेलेल्या कोंबड्या गोण्यात घालून फेकून देण्यात आल्या होत्या. पथकाने मृत कोंबड्यांचे नमुने घेतले असून निदानासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. पक्षी किंवा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास त्वरीत पशुसंर्वधन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी केले आहे.
 

Web Title: The panic increased; 436 hens die at Shirapur in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.