घर फोडण्याचं पातक आपल्यावर लागू नये : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 04:49 PM2019-02-06T16:49:23+5:302019-02-06T16:50:11+5:30
रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच राजकारण जिल्ह्यात होत आहे.
बीड : रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच राजकारण जिल्ह्यात होत आहे. अस राजकारण संस्कृतीला शोभत नाही. कोणाच घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही सांभाळतो अशा भावना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यात घराघरात राजकारण करणे सुरु आहे; याने रक्ताचा माणूस आपला राहत नाही. ऐवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं, आम्ही अस कधी करत नाही. कोणाचेही घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही जपला आहे. असाच प्रसंग आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आला. यावेळी मी जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबर राहिले कारण मी घर फुटल्याचे दुःख भोगले आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीने विकासाच बीज पेरल नाही
पूर्वी रस्ते कागदावर व्हायचे, अधिकाऱ्यांना कोंडून सह्या घेतल्या जायच्या. मात्र, आम्ही हे सगळं बदले.डोळ्याला काम दिसत आहें, हे समाधान देणार आहे. राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात राजकारणाच बीज पेरले पण विकासाच बीज पेरले नाही. विकासाला आडव येतील त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून देवू, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला.
पहा व्हिडिओ :