'दसऱ्याच्या तयारीला लागा, भगवान भक्तीगडावर भेटू', पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 03:29 PM2022-09-27T15:29:58+5:302022-09-27T15:30:54+5:30
पंकजा मुंडे यांनी व्हिडिओद्वारे दसरा मेळाव्यासाठी सर्व भाजप समर्थकांना येण्याचे आवाहन केले आहे.
परळी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरुन जोरदार वाद सुरू होता. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेण्याचा वाद कोर्टात गेला. अखेर कोर्टाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासोबतच बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याचीही जोरदार चर्चा असते.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून मुंडेंचा दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने झाला होता. मात्र यावर्षी परवानगी मिळाल्याने हा मेळावा मोठ्या प्रमाणात हा मेळावा साजरा केला जाणारा आहे. त्याच अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव मध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता.
Covid मुळे अधूरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे...त्या दिवसाच्या प्रतिक्षेत...तो दिवस आपला.. एक अनोखा दिवस... कोणता दिवस,कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???..तुम्हाला तर माहीत आहेच...लागा तयारी ला... pic.twitter.com/8Cc9Onc28z
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2022
21 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओसोबत पंकजा मुंडे म्हणाल्या होता, 'कोरोनामुळे अधूरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या दिवसाच्या प्रतिक्षेत...तो दिवस आपला...एक अनोखा दिवस...कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???..तुम्हाला तर माहीत आहेच...लागा तयारी ला,' असे आव्हान पंकजा मुंडेंनी केले होते.
नऊ दिवस प्रतीक्षा आणि प्रतिष्ठा... जबरदस्त तयारी भगवान बाबांच्या सावरगावची वारी... pic.twitter.com/PQrPSxMwB0— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 27, 2022
दरम्यान, आजही पंकजा मुंडे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट करुन मेळाव्या संदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला पंकजा मुंडे नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, दसरा म्हणजे, आपल्या स्वाभिमानाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या सर्वांच्या शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा दिवस. आपण सर्वांनी दसऱ्याच्या तयारीला लागा आणि दसऱ्याच्या दिवशी मेळाव्यात भेटूया, असे आव्हानही केले.
विशेष म्हणजे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना दसरा मेळावा भगवान गडावर व्हायचा. पण, त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत पंकजांच्या मेळाव्याला विरोध करण्यात आला होता. तेव्हापासून हा मेळावा सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो.