पंकजा मुंडे गांवकऱ्यांसोबत रमल्या किर्तन श्रवणात, ग्रामस्थांचा वाढवला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:20 PM2022-02-07T18:20:00+5:302022-02-07T18:20:15+5:30

ग्रामस्थांसमवेत सहभाग घेऊन आज त्यांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.

Pankaja Munde listened kirtan with the villagers in Nathra, Parli | पंकजा मुंडे गांवकऱ्यांसोबत रमल्या किर्तन श्रवणात, ग्रामस्थांचा वाढवला उत्साह

पंकजा मुंडे गांवकऱ्यांसोबत रमल्या किर्तन श्रवणात, ग्रामस्थांचा वाढवला उत्साह

googlenewsNext

परळी- व्यक्ती कितीही मोठया पदापर्यंत पोचला तरी आपलं गावं आणि आपल्या माणसांना कधी विसरत नाही, त्यांच्या सानिध्यात राहण्याचा त्याचा सातत्याने प्रयत्न असतो, अगदी तशीच परंपरा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जोपासत असतात. गावांतील अखंड हरिनाम सप्ताहात ग्रामस्थांसमवेत सहभाग घेऊन आज त्यांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नाथरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, आज या सप्ताहाची मोठया उत्साहात सांगता झाली. ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर यांचे यानिमित्त दुपारी काल्याचे किर्तन होते. पंकजाताई मुंडे दरवर्षी गावातल्या सप्ताहात सहभागी होत असतात, अगदी मंत्री असतांना सुध्दा त्यांनी ही परंपरा जोपासली होती. आज देखील त्या सर्व ग्रामस्थांसमवेत खाली बसून किर्तन श्रवणात तल्लीन झाल्या, त्यांच्या सहभागाने ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला. रविवारी त्यांच्या वतीने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: Pankaja Munde listened kirtan with the villagers in Nathra, Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.