“देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा”; पंकजा मुंडेंची भरसभेत स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:15 PM2021-12-19T12:15:43+5:302021-12-19T12:16:38+5:30

ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

pankaja munde praised devendra fadnavis in beed rally | “देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा”; पंकजा मुंडेंची भरसभेत स्तुतिसुमने

“देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा”; पंकजा मुंडेंची भरसभेत स्तुतिसुमने

Next

बीड: भाजपचे विधानसभेचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात सगळे काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच रंगल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा काहीसा कमी झाल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी भरसभेत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कडून संयम शिकण्यासारखा असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे लोकार्पण सुरु असताना, या कार्यक्रमाचे मुंबईत प्रक्षेपण सुरू होते. यावेळी देखील दोन्ही नेते एकत्र आले होते. दोन्ही नेते एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले होते. राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक ही काळी निवडणूक आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा या सरकारने दिला पाहिजे. येणाऱ्या २६ जानेवारीपासून याच अनुषंगाने महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाचा डेटादेखील राज्य सरकारने केंद्राकडे दिला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी संयम दाखवला

काही लोक देवेंद्र फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. ५०-५० टक्के जागा मागत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. त्यानंतर त्यांना मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटले ५० टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभे करा. शिरुरमध्येही युती करा, असे सूचवले होते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राजकरणात मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे. साहेबांनी मला बेरजेचे राजकारण शिकविले. मात्र इथे बीड जिल्ह्यात गुणाकाराचे राजकारण शिकले. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. पालमंत्री असताना कोट्यवधीचा निधी दिला. मात्र, गेल्या दोन वर्षात काहीही निधी मिळाला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली. 
 

Web Title: pankaja munde praised devendra fadnavis in beed rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.