पंकजा मुंडे, विनायक मेटे यांच्यात ‘संग्राम’? जाणवू लागली कटूता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:09 AM2018-07-01T00:09:19+5:302018-07-01T00:13:38+5:30

सत्ताधारी असो की विरोधक; बीड जिल्ह्यातील राजकारणात बारा महिने धुसफूस चालूच असते. मांडीला मांडी लावून दुसऱ्याचा गेम करणारे कधी एकमेकाचे विरोधक होतील, याचा नेम नाही.

Pankaja Munde, Vinayak Mete's 'Sangram'? Bitter! | पंकजा मुंडे, विनायक मेटे यांच्यात ‘संग्राम’? जाणवू लागली कटूता !

पंकजा मुंडे, विनायक मेटे यांच्यात ‘संग्राम’? जाणवू लागली कटूता !

Next


सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
सत्ताधारी असो की विरोधक; बीड जिल्ह्यातील राजकारणात बारा महिने धुसफूस चालूच असते. मांडीला मांडी लावून दुसऱ्याचा गेम करणारे कधी एकमेकाचे विरोधक होतील, याचा नेम नाही.

आपापल्या सोयीप्रमाणे जिल्ह्यातील राजकारणी मंडळी ही पक्षहित, धोरण, निष्ठा वेशीवर टांगत कधी राजकीय तडजोड करतील, हे सांगता येत नाही. बीड जिल्हा परिषद, बीड नगर पालिका आणि नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही हेच पहावयास मिळाले. संख्याबळात जवळपास दोनशे मतांनी पिछाडीवर असताना देखील भाजपाचे सुरेश धस हे ७४ मतांनी विजयी झाले होते, यावरून आपल्या लक्षात येईल की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी पक्षादेश कसा वेसीवर टांगला होता. एकमेकाचे बोट धरून राजकारणात उतरले असतील तरी जम बसल्यानंतर बीड जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून सर्वच जण स्वत:ला स्वयंभू नेता समजायला लागतो. जो नेता असतो तो बोलून दाखवित नाही तर वेळप्रसंगी आपल्या राजकीय ताकदीचा झटका विरोधकांना देत असतो, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात आ.विनायक मेटेंचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी छुपा ‘संग्राम’ चालू आहे की काय, हे वाटण्याइतपत त्यांच्यातील राजकीय दुरावा वागण्यात, बोलण्यात दिसत आहे. बिंदूसरा नदीवरील पुुलापासून ते राष्टÑीय महामार्गाच्या वळण रस्त्याचे श्रेय घेण्यावरून मुंडे भगिनी, क्षीरसागर बंधू आणि शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केलेली ‘फोटोगिरी’ जिल्ह्याने चांगलीच पाहिली होती. जिल्ह्याच्या राजकारणात मतभेद बाजूला सारून जवळ येत असलेले क्षीरसागर-मेटे यांच्यात याच श्रेयावरून दुरावा निर्माण झाला तर सत्ताधारी पक्षात असूनही पालकमंत्री पंकजा मुंडे -आ.विनायक मेटे यांच्यात कटूता निर्माण होण्यास सुरूवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र नारायणगडावरील २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ करून मेटेंनी आपली राजकीय ताकद जिल्ह्याला दाखवताना मराठा समाजाचा आपणच नेता असल्याचा ‘संदेश’ यानिमित्ताने दिला होता.

बिंदुसरेवरील प्रस्तावित पूल असो की सामाजिक न्याय खात्याचा राज्यस्तरीय व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असो वा इतर यासारखे विषय असो; मेटेंनी सर्वाना टाळत ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतल्याने पंकजा मुंडेंची नाराजी ओढवून घेतली. आचारसंहितेमुळे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम ऐन उद्घाटनाच्या दिवशी रद्द करावा लागला. याचा दोष पालकमंत्र्यांना देत मेटेंनी आपली नाराजी जगजाहीर केली होती. दोन दिवसांपूर्वी एका पत्रपरिषदेत पंकजा मुंडे यांनी बिंदुसरेवरील पूल लवकरच वाहतुकीस खुला होईल, हे सांगताना पुलाच्या बाबतीत अनेकांनी केलेल्या राजकारणाचा उल्लेख मेटेंचा नामोल्लेख टाळत केला होता. यावरून दोघांत चालू असलेल्या ‘शिवसंग्राम’ला पुष्टी मिळाली.

Web Title: Pankaja Munde, Vinayak Mete's 'Sangram'? Bitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.