'सामने से वार करना, फिर मुझे आजमाना', पंकजा मुंडेंचा विरोधकांवर कवितेतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 04:36 PM2018-10-18T16:36:57+5:302018-10-18T16:37:37+5:30

मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसं तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले.

Pankaja Munde's opponents in poem | 'सामने से वार करना, फिर मुझे आजमाना', पंकजा मुंडेंचा विरोधकांवर कवितेतून निशाणा

'सामने से वार करना, फिर मुझे आजमाना', पंकजा मुंडेंचा विरोधकांवर कवितेतून निशाणा

Next

बीड - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून नाव न घेतला धनंजय मुंडेंना टोला लगावला. तसेच भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती माझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी कशालाच घाबरत नाही, असे म्हणत पंकजा यांनी विरोधक आणि भाजपमधील अंतर्गत विरोधकांवरही नाव न घेता टीका केली. तसेच 'दू दबे पाव चोरी छुपे स न आना, सामने से वार करना, फिर मुझे आजमाना' असा काव्यात्मक टोलाही पंकजा यांनी आपल्या विरोधकांना लगावला. 

मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसं तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. मध्यतरी काही सर्वे आले, ज्यामध्ये प्रितमताईंची खासदारकी धोक्यात, धोक्याची घंटा असं काहीही सांगण्यात आलं. आम्ही पक्षात चांगल काम करा म्हटलं की, हे असले सर्व्हे आले. पण, मी तसले सर्व्हे-फिर्व्हे मानत नाही. तुम्ही, माझी माणसं हीच माझा सर्व्हे आहे, इथ येऊन पाहा, असे म्हणत पंकजा यांनी पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना टोला लगावला. पंकजा यांनी यावेळी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मौत से ठन गई या कवितेतील ओळींच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष केलं. विरोधकांना टोला लगावताना आम्ही कामं करतो, मनोरंजनाचे कार्यक्रम करत नाही. त्यांनी एखादा हौद तरी बांधला का ? असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. 

यंदा प्रथमच बीड जिल्ह्यात आपण दसरा मेळावा घेत आहोत. पण, आज खऱ्या अर्थानं भगवान बीड जिल्ह्यात बाबांच आगमन झालं आहे. बीड जिल्ह्यात सावरगाव येथे आज भगवान बाबांच्या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे. हे पवित्र स्थान आजपासून भगवान भक्तीगड म्हणून ओळखला जाईल असेही पंकजा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले. 

दू दबे पाव चोरी छुपे स न आना
सामने से वार करना, फिर मुझे आजमाना
मौत से बेखबर जिंदगी का सफर
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर। 

बात ऐसी भी नई कोई गम नही
अपने और पराए कम नही
प्यार इतना परायों से मुझको मिला
अपनों से बाकी नही है कोई गिला

हर चुनौती से दो हाथ मैना किए
आँधीयों से जलाए हैं, बुझते दिये। 

Web Title: Pankaja Munde's opponents in poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.