परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:13 AM2018-06-22T00:13:54+5:302018-06-22T00:13:54+5:30

 Parali-Beed-Nagar Margas speed; 90 percent land acquisition completed | परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

Next

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

जिल्ह्यातील विविध खात्याच्या विकास कामांचा आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

रेल्वेमार्गाच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, या मार्गासाठीचे १३३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले असून, जवळपास ३७६ कोटी रुपयांचा मावेजाही अदा करण्यात आला आहे. २०१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन काही तांत्रिक कारणामुळे, जमिनीच्या कोर्ट कचेऱ्यातील वादामुळे बाकी आहे. हे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे, असे त्या म्हणाल्या. या मार्गासाठी आवश्यक तेवढे भूसंपादन झाले असून, अतिरिक्त जागेची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या ६० वर्षांपासूनचे बीड जिल्ह्याचे हे स्वप्न असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या संदर्भात संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्यस्तरावरील बहुतांश अडचणी दूर केल्या असून, केंद्रस्तरावरील प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्याशी चर्चा करून या कामास गती देणार, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सोलापूर-धुळे या राष्टÑीय महामार्गाचे जिल्ह्यात ७८ कि.मी. लांबीचे काम आहे. हे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या मार्गाचेही १०० टक्के भूसंपादन झाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बिंदुसरेवरील पूल १० जुलैपर्यंत पूर्ण होणार
बीड शहरातून वाहणाºया बिंदूसरा नदीवरील पूल वाहून गेला होता. याठिकाणी उभारण्यात येणाºया नवीन पुलाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, येत्या १० जुलैपर्यंत हे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पुलाच्या बाबतीत अनेकांनी राजकारण केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Parali-Beed-Nagar Margas speed; 90 percent land acquisition completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.