पारगाव सिरसमध्ये बनावट देशी दारू बनविणाऱ्या अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:31 AM2019-02-28T00:31:07+5:302019-02-28T00:32:34+5:30

बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.

In Pargaon Cirus, print out the country making fake country liquor | पारगाव सिरसमध्ये बनावट देशी दारू बनविणाऱ्या अड्डयावर छापा

पारगाव सिरसमध्ये बनावट देशी दारू बनविणाऱ्या अड्डयावर छापा

Next
ठळक मुद्देबीड विशेष पथकाची कारवाई : पाच आरोपींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींस पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथे बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.
लतीब सय्यद हकीम (३४ रा.पारगाव सिरस), सुशील बबन शिंदे (२७ रा.पालवण), गणेश राधाकिशन उगले (३६), सुमंत वशिष्ट नवले (३८), अशोक उर्फ सोनू शेषेराव पवार (२०) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. गत काही दिवसांपासून पारगाव शिवारात बनावट दारू बनविली जात असल्याची माहिती पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्यांनी खात्री करून बुधवारी पहाटे सापळा लावला. सकाळी ९ वाजता दारू बनविण्यास सुरूवात करताच पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला. यात तयार केलेल्या बनावट दारूचे ५० बॉक्स, सीलींग मशीन, मिक्स करणारा पाण्याच पंप, रिकाम्या बाटल्या, रिकामे झाकण, कागदी पुष्टे, स्टीकर, बॉक्स पॅक करण्याचे चिकट टेप, चारचाकी गाडी (एमएच १२ ईजी ९०२८) असा एकूण ४ लाख ८३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच २०० लिटर रसायनही नष्ट केले. सागडे यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोउपनि रामकृष्ण सागडे, पांडूरंग देवकते, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे, सायबर सेलचे विकी सुरवसे आदींनी केली.
दोन वर्षांपासून व्यवसाय
सूत्रांच्या माहितीनूसार लतीब व सुशील हे याचे मास्टरमार्इंड आहेत. इतर तिघे कामगार आहेत. मागील दोन वर्षांपासून ते हा बनावट दारूचा व्यवसाय करतात. आतापर्यंत ते परजिल्ह्यात दारू बनवित होते. १० दिवसांपूर्वीच ते पारगावला आले आणि बुधवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. दरम्यान, बनावट दारू बनविणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Web Title: In Pargaon Cirus, print out the country making fake country liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.