जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 16:56 IST2021-09-07T16:53:41+5:302021-09-07T16:56:09+5:30

पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत आहे

Parli-Ambajogai road closed due to heavy rains | जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद

जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद

परळी :  शहर व ग्रामीण भागात सोमवार पासून जोरदार पाऊस चालू आहे. मंगळवारी ही पहाटे पासून पाऊस सुरूच आहे. परळी- अंबाजोगाई मार्गाचे काम सुरु असून कन्हेरवाडी गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता वाहतुकीसाठी  पावसामुळे काही वेळ बंद करण्यात आला आहे. खबरदारी घेण्याचे आवाहन कन्हेरवाडी ग्रामस्थांनी केले आहे 

राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त परळी-अंबाजोगाई मार्गावरील कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांचे सहकारी भर पावसात घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. पावसामुळे छोट्या नद्या नाले यांना पूर आला. तर पूले पाण्याखाली गेले आहेत.शहरात काल पासून संततधार पाऊस चालू आहे.

हेही वाचा :
- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजी वाढली; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले
- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

Web Title: Parli-Ambajogai road closed due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.