परळी-नगर रेल्वे काम अपु-या निधीमुळे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:41 AM2017-12-20T00:41:36+5:302017-12-20T00:41:42+5:30
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली.
नागपूर येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या रेल्वेमार्गाच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीस दिवाकर रावते, आ.अमरसिंह पंडित, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता विरेंद्रकुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता एम.के. सिरोलिया, गृह विभागाचे सचिव, परिवहन विभागाचे सचिव, सभापती कार्यालयाचे सचिव आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता विरेंद्रकुमार अग्रवाल यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गात येणाºया अडचणी आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी होणारी दिरंगाई याविषयी चिंता व्यक्त केली. २०१२ मध्ये सोलापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यासाठी ३२६७ कोटी रुपये अंदाजित खर्च असून, हा मार्ग किफायतशीर नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर- बीड- जळगाव रेल्वेमार्गासाठी आग्रह धरीत तो कसा फायदेशीर आहे, हे आ. पंडित यांनी बैठकीत सांगत या मार्गाचे पुन:सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी तीन महिन्यात नवीन सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन, याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सोलापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गासाठी आ. पंडित यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. या सततच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा या मार्गांचे सर्वेक्षण होऊन त्यास मंजुरी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, नारायणडोह ते सोलापूरवाडी या दुस-या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी रावते यांनी दिली.