परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:51+5:302021-09-08T04:39:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सध्या राज्यभर गाजत असलेल्या करुणा शर्माप्रकरणी भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन ...

Parli is numb, the neck of the kingdom has gone down | परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली

परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : सध्या राज्यभर गाजत असलेल्या करुणा शर्माप्रकरणी भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले. मंगळवारी याप्रकरणी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे परळी सुन्न आहे. यामुळे राज्याची मान खाली गेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात करुणा शर्मा प्रकरणावर घडमोडी घडत आहेत. यावर दोन दिवसांनंतर पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात बांधू शकत नाही हा विश्वास हरवू नये. ‘राँग प्रेसिडेंट शुड नॉट बी सेट !’ ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, यामुळे राज्याची मान खाली गेली, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Web Title: Parli is numb, the neck of the kingdom has gone down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.