परळी येथील थर्मलमध्ये २७२ मेगावॅट विजेची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 07:01 PM2020-02-03T19:01:34+5:302020-02-03T19:02:25+5:30
या तीन संचातून गेल्या आठवड्यात विक्रमी वीजनिर्मिती झाली होती.
परळी (जि. बीड) : तालुक्यातील दाऊतपूर येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मे.वॅ.क्षमतेचा संच क्र . ८ शुक्रवारी सायंकाळी बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद ठेवण्यात आला आहे.
या लिकेजमुळे वीजनिर्मितीमध्ये २७२ मेगावॅट विजेची तूट आली. या संचाच्या दुरूस्तीचे काम चालू असून सोमवारपर्यंत हा संच दुरूस्त होण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी तीन पैकी दोन संच चालू होते. दोन संचातून ४७८ मे.वॅ. एवढी वीजनिर्मिती सुरु होती. एकूण ७५० मे.वॅ. क्षमतेच्या ३ संचापैकी १ संच बंद असल्याने २७२ मे.वॅ. विजेची तूट भासली. संच क्र. ६ व ७ हे दोन संच सुरू आहेत. परळी तालुक्यातील दाऊतपूर येथे २५० मे.वॅ. क्षमतेचे संच क्र. ६, ७ व ८ हे तीन संच आहेत. या तीन संचातून गेल्या आठवड्यात विक्रमी वीजनिर्मिती झाली होती.
क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत असतानाच शुक्रवारी संच क्र. ८ हा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद ठेवावा लागला. तसेच संच क्र. ६ व ७ हे कमी क्षमतेने चालविण्याचे आदेश आल्याने यातून वीजनिर्मिती क्षमतेपेक्षा कमी होत आहे. त्यामुळे शनिवारी एकूण २७२ मे.वॅ. ची तूट भासली.