पेठबीडमध्ये मटका अड्ड्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:44 IST2018-11-13T23:43:36+5:302018-11-13T23:44:10+5:30
शहरातील पेठबीड भागात मटका अड्डयांवर धाडी टाकून चार एजंटांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी केली.

पेठबीडमध्ये मटका अड्ड्यांवर धाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील पेठबीड भागात मटका अड्डयांवर धाडी टाकून चार एजंटांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी केली.
पेठबीड भागात मटका खेळला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. तेलगाव नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी मटका चालविणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बीड शहर व पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख कैलास लहाने, पोह. तुळशीराम जगताप, पी.टी.चव्हाण, पो.ना. विठ्ठल देशमुख, संजय चव्हाण, विजय पवार, जयराम ऊबे आदींनी केली.