पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:53+5:302021-09-06T04:37:53+5:30

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण ...

Paryushana is the festival of living a flawless life | पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

Next

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण महापर्वात जैन धर्मीय समाजबांधव भगवान महावीरांचा हा संदेश आचरणात आणत दोषमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न विश्वासाठीही वरदान ठरतो. या दिवसात जैन बांधव भौतिक सुविधांचा, पाणी, हिरव्या वनस्पतींचा त्याग आणि स्वेच्छेने आनंद आणि उपभोग संसाधनांचा त्याग करून ते त्यांना समृद्ध करतात, वाचवतात, जे सृष्टीतील प्राण्यांसाठी वरदान आहे, अशी माहिती अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक गौतमचंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जैन धर्मीय या आठ दिवसांत पाच प्रकारची कर्तव्ये पार पाडून, ते परमेश्वरावर विश्वास दाखवतात. अमारी प्रवर्तन म्हणजे दुःखी जिवांना वाचवणे, हिंसा न करणे, स्वामीवात्सल्य अर्थात धार्मिक जीवन जगणाऱ्याला आदर आणि सन्मान देणे, क्षमापना म्हणजे एकमेकांशी वैर, संघर्ष आणि वैमनस्य दूर करणे, अट्ठम तप म्हणजे पाण्याशिवाय किंवा केवळ गरम पाण्याने तीन उपवास करणे, चैत्यपरिपाटी अर्थात सर्व जिनेश्वरांच्या मंदिरांची पूजा करून आत्मा शुद्ध करणे होय. पर्वादरम्यान मुक्या प्राण्यांना चाराही दिला जातो. या धार्मिक उपक्रमांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही आधार आहे.

050921\screenshot_20210905-192906_whatsapp.jpg

गौतमचंद सोळंकी

Web Title: Paryushana is the festival of living a flawless life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.