पॅसेंजर रेल्वेला अद्यापही लॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:01+5:302021-08-19T04:37:01+5:30

परळी : कोरोनामुळे गेल्या १७ महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची ...

The passenger train is still locked | पॅसेंजर रेल्वेला अद्यापही लॉकच

पॅसेंजर रेल्वेला अद्यापही लॉकच

Next

परळी : कोरोनामुळे गेल्या १७ महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र अनलॉक झाला असला तरी पॅसेंजर रेल्वेला अद्यापही लॉकच आहे. परळी रेल्वे स्टेशनमार्गे पॅसेंजर रेल्वे गाड्या धावत होत्या, त्या गाड्या सतरा महिन्यांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात चालू आहे तरी ही पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्याप सुरू केल्या नाहीत. सध्या प्रवाशांना एस. टी. महामंडळाच्या बसने किंवा खासगी बसने प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे

सुरू असलेल्या एक्स्प्रेस

नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड काकीनाडा-शिर्डी, शिर्डी-काकीनाडा-सिकंदराबाद-शिर्डी, शिर्डी - सिकंदराबाद, विजयवाडा -शिर्डी , शिर्डी- विजयवाडा, औरंगाबाद- हैदराबाद , हैदराबाद - औरंगाबाद बंगळूरू - नांदेड, नांदेड- बंगळूरू कोल्हापूर -, नागपूर,नागपूर - कोल्हापूर , कोल्हापूर -धनबाद , धनबाद-कोल्हापूर , आदिलाबाद -परळी ,परळी -आदिलाबाद बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे परळी- अकोला, अकोला परळी, पंढरपूर निजामाबाद, निजामाबाद -पंढरपूर ,परळी- पूर्णा ,पूर्णा - परळी , परळी- मिरज ,मिरज परळी. बंद असलेले एक्स्प्रेस. पुणे- अमरावती, अमरावती- पुणे साप्ताहिक रेल्वे

जवळच्या प्रवासासाठी पॅसेंजर रेल्वेसारखा स्वस्त पर्याय बंद ठेऊन विशेष रेल्वे चालवणे म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाश्यांची विशेष लूटच आहे. कोरोना परळी शहरात शून्यावर तर जिल्हा, राज्यात निचांक पातळीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे आता तरी पॅसेंजर रेल्वे सेवा चालू करावी व प्रवाशांना दिलासा द्यावा.

अश्विन मोगरकर

पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. परळी रेल्वे स्टेशनमार्गे अकोला, पंढरपूर, पूर्णा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे त्यामुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.

सचिन कागदे, नगरसेवक परळी

Web Title: The passenger train is still locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.