कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पाटोदा ठरला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:18 AM2019-05-21T00:18:11+5:302019-05-21T00:19:27+5:30
जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे.
बीड : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून आरोग्य सेवेचा कारभार सुधारला आहे. कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागायचे. मात्र, आता ही सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध झाल्याने त्रास व वेळ वाचत आहे. या शस्त्रक्रिया स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह डॉ.अमोल मुंडे, डॉ.गाडे हे करतात. दरम्यान, पाटोदा तालुक्याने ४९ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर वडवणी ४८, केज ३३ यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी म्हणजेच ९ टक्के शस्त्रक्रिया परळी तालुक्यात झाल्या आहेत. डॉ. थोरात, डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, अंमळनेरचे डॉ.राजेंद्र खरमाटे, नायगावचे डॉ.मदन काकड हे शिबिराचे नियोजन करीत आहेत.
दोन ठिकाणी शिबिरे
पाटोदा तालुक्यात अंमळनेर व नायगाव येथे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. डोंगरकिन्ही व वाहलीच्या महिलांना अंमळनेर येथे पाठविले जाते. डॉ.शेख, डॉ.सुमेधा भोंडवे, डॉ.कागदे यांच्याकडून ही नोंदणी केली जाते.
तालुक्यात अव्वल आल्याचा आनंद आहे. अंमळनेर व नायगाव येथे शस्त्रक्रिया केल्या जातात. २२ मे रोजी आणखी एक शिबीर आयोजित केले आहे.
- डॉ.लक्ष्मीकांत तांदळे
तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा