पाटोद्यात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:31 PM2019-03-15T23:31:46+5:302019-03-15T23:32:15+5:30
परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते.
पाटोदा : परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली तर अवघे दोन पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. शुक्र वारी दुपारी येथील प्रियदर्शिनी कन्या शाळा परीक्षा केंद्रावर अक्षय शहाजी जाधव रा. पाटोदा आणि केतन गर्जे, अंगद काळुशे, आसाराम सानप, अमोल गर्जे व इतर (सर्व रा. महासांगवी) यांच्यात बाचाबाची झाली .अक्षय याच्या म्हणण्यानुसार त्यास परीक्षा केंद्रावर बोलावून घेतले होते .तो आणि मामेभाऊ ओम भोसले केंद्रावर गेले. तेथे त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. मारहाणीच्या भीतीपोटी अक्षय आणी ओम तेथून पळून घरी गेले. सांगवीच्या तरु णांनी त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. घरात घुसून मारहाण केली. महिलांनाही मारहाण करण्यात आली .
दरम्यान काही वेळात महासांगवी येथून तरु णांच्या काही टोळ्या शहरात जाधव यांच्या घरासमोर आल्या. समोर दुसरी टोळीही सतर्क होती. लाठ्याकाठ्यासह खुलेआम मारामारी आणि दगडफेक झाली. काही दुकानांच्या शटरवर दगड लागले तर काही तावदाने फुटली. त्यामुळे दहशतीपोटी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. सहायक उपनिरीक्षक विष्णू जायभाये आणि बळीराम कातखडे या दोघांनी धैर्याने परिस्थिती हाताळत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आष्टी येथे नव्याने रु जू झालेले उपअधीक्षक विजय लगारे घटनास्थळी दाखल झाले .वाढीव पोलिस कुमक मागवण्यात आली.
गतवर्षीच्या वादातून शुक्रवारची घटना
अक्षय याच्या म्हणण्यानुसार गतवर्षी वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यावरून महासांगवीच्या योगेश सानप , केतन गर्जे, विशाल अडागळे, सूरज मिसाळ यांचा वाद झाला होता. पोलिसात याबाबत तक्र ार दाखल आहे . याच कारणावरून शुक्र वारची घटना घडल्याचे सांगण्यात आले.