पाथर्डीच्या वारकऱ्याची पाटोद्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:56 AM2019-07-08T00:56:34+5:302019-07-08T00:57:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : शहरालगत असलेल्या शेतातील चिकूच्या बागेतील झाडास गळफास घेऊन ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली. शनिवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : शहरालगत असलेल्या शेतातील चिकूच्या बागेतील झाडास गळफास घेऊन ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या केलेल्या इसमाच्या खिशातील डायरीवरून हा इसम पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील आहे. ते भगवानबाबांच्या पालखीतील वारकरी आहेत.
पाटोदा शहरालगत चक्रपाणी जाधव यांची जमीन आहे. त्यांच्या बागेतील चिकूच्या झाडास पंचाने गळफास घेतलेला इसम दिसून आला. जाधव यांनी पोलिसांत याबाबत कळवले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, जमादार राजेश रायकर, रुद्रा गर्जे, आय बाईक पथकाचे अमोल ढवळे, उद्धव गडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून खिशातील साहित्याची पडताळणी केली असता डायरीवरून आत्महत्या केलेली व्यक्ती ढाकणवाडी येथील पांडुरंग रघुनाथ ढाकणे असल्याचे स्पष्ट झाले. डायरीमधील फोन क्रमांकावरून पोलिसांनी नातेवाईकांना माहिती कळवली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.