आष्टी ते साबलखेड रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 01:45 PM2023-02-20T13:45:34+5:302023-02-20T14:03:57+5:30
रस्ता दुरुस्तीचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले
- नितीन कांबळे
कडा (बीड) - आष्टी-कडा-साबलखेड या १७ किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अर्धवट काम त्वरित सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी ते साबलखेड हा १७ किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला होता. अनेक वेळा उपोषण, रस्तारोको, गांधीगीरी केल्यानंतर १२१ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. कामाचे टेंडर निघाले, झाडाची मोजणी, साईट पट्टे सापसफाई ही कामे हाती घेतले. पण त्यानंतर कामाला गती नाही. यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. याचे काम तातडीने काम सुरू करावे या मागणीसाठी नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान, आठ दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार विनोद गुंडांनवार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या रस्तारोको आंदोलनात माजी आमदार साहेबराव दरेकर, सरपंच युवराज पाटील, संदिप खाकाळ, दिपक सोनवणे, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, माजी सभापती संजय ढोबळे, यशवंत खंडागळे, अशोक ढवण, पोपट गर्जे, जय शिंदे, संतोष मेहेत्रे, सुनील अष्टेकर, सुभाष ढोबळे, संजय थोरवे, दीपक कर्डिले, बिपीन भंडारी, रमेश शिरोळे, दिपक गरूड यांच्यासह कडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. कडा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पवार, प्रमोद काळे, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, मंगेश मिसाळ, रियाज पठाण, राजकिरण निमसे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.