एक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:26 AM2018-10-17T00:26:52+5:302018-10-17T00:27:24+5:30
केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारातून नवीन उभारलेल्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एसी बसविल्या जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीचे खा.प्रीतम मुंडे यांनीही स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारातून नवीन उभारलेल्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एसी बसविल्या जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीचे खा.प्रीतम मुंडे यांनीही स्वागत केले.
जिल्हा रूग्णालयात नुकतेच १८ खाटांचा नवीन आयसीयू कक्ष उभारण्यात आला आहे. खा.प्रीतम मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरिदास आदींच्या उपस्थितीत हा कक्ष मंगळवारी सुरू करण्यात आला. या कक्षात एसी नसल्याने रूग्णांचे हाल होणार होते. यावेळी डॉ.थोरात यांनी सर्व अधिकारी, कर्मचाºयांना आवाहन करीत केरळ प्रमाणेच जिल्हा रूग्णालयासाठी एका दिवसाचा पगार द्या, असे सांगितले. याला सर्वांनी होकार देत पगार देण्याचे ठरविले. जवळपास पाच लाख रूपये जमणार असून यातून सर्व कक्षात एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
गौतम खटोड यांचा सन्मान
नवीन आयसीयू कक्षात दोन लाख रूपयांचे साहित्य देणारे स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाणचे गौतम खटोड यांचा खा.प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शुभम खटोड, आशिष खटोड, कोमल खटोड (मुनोत), श्रद्धा खटोड (बोरा), योगेश बोरा, सिद्धार्थ मुनोत आदींची उपस्थिती होती.
पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार
२०० खाटांच्या रूग्णालयाच्या बजेटसाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच १०० खाटांच्या रूग्णालयाचे भूमिपुजनही लवकरच करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासन खा.प्रीतम मुंडे यांनी बोलताना दिले.