११ हजार दिव्यांनी पावनधामचा ‘दीपस्तंभ’ उजळून निघाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:47 AM2018-11-11T00:47:09+5:302018-11-11T00:47:45+5:30
औरंगपूर येथील पावनधाम येथे दीपावली पाडवानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी भाविकांनी सायंकाळी सात वाजता ११ हजार दिवे लावत दीपोत्सव साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील औरंगपूर येथील पावनधाम येथे दीपावली पाडवानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी भाविकांनी सायंकाळी सात वाजता ११ हजार दिवे लावत दीपोत्सव साजरा केला.
संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली औरंगपूर येथील पावनधाममध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मठाधिपती भगवान महाराज वरपगावकर, अशोक महाराज शिंदे, गणेश महाराज भगत पुणेकर, प्रदीप महाराज अकोलेकर, भागवत शिंदे, अरुण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना महादेव महाराज बोराडे म्हणाले की, दिव्याप्रमाणे आपणही स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशमान करावे. बीड जिल्ह्यात भयंकर दुष्काळ आहे अशावेळी माय-बाप पांडुरंगाने दुष्काळाचे सावट दूर करून सर्वांवर कृपा करावी.
या प्रसंगी गायक प्रा. प्रसाद कुलकर्णी, स्वरा गणेश भगत आणि ह.भ. प.जनार्धन स्वामी चलवाड यांचा ‘भक्तीरंग’ हा स्वरमयी अभंगाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल महाराज जाधव, अशोक महाराज वाघ, गणपत पांचाळ, उत्तमबप्पा पारेकर आणि परिसरातील भाविकांनी विशेष प्रयत्न केले.