पवने पितापुत्रांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:45 PM2019-08-07T23:45:10+5:302019-08-07T23:45:59+5:30

शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अ‍ॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Pawnee's father's closet extends to three days | पवने पितापुत्रांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

पवने पितापुत्रांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

Next

बीड : शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अ‍ॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत हे करत आहेत, यांनी आरोपींकडून खुनात वापरलेली कुकरी, गज ही हत्यारे जप्त केली आहेत मात्र, फिर्यादीमध्ये देण्यात आलेली हत्यारे अजून हस्तगत झालेली नाहीत. तसेच आरोपींकडून तपासाच्यासंदर्भात योग्य प्रतिसाद दिला जात नाही. या प्रकरणात आणखी तपास करण्याची गरज असल्यामुळे अधिक तपासाठी तीन्ही आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडींची मागणी केली होती. पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत व सपोनि.सुजित बडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आरोपी वकील असल्यामुळे लागतोय वेळ
या प्रकरणातील एक आरोपी हा पेशाने वकील आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत तपासाला प्रतिसाद न देता या काळात वेळ कसा घालवायचा हे त्याला माहिती आहे.
किसन पवने हे आपल्या वयाचे कारण पुढे करुन तपासादरम्यान माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी बुधवारी न्यायालयात करण्यात आली होती.

Web Title: Pawnee's father's closet extends to three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.