रीडिंग घेऊनच वीज बिल द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:51+5:302021-05-14T04:32:51+5:30

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जे वीज बिल दिले जात आहे ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ...

Pay electricity bill only after taking readings | रीडिंग घेऊनच वीज बिल द्यावे

रीडिंग घेऊनच वीज बिल द्यावे

Next

अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जे वीज बिल दिले जात आहे ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहेत. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजेश गुप्ता यांनी केली आहे.

पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शासकीय विश्रामगृहा लगत पोलीस कर्मचारी वसाहत आहे. या वसाहतीत पोलिसांची अनेक कुटुंबे राहतात. ही वसाहत खूप वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या भिंती, दरवाजे, खिडक्या नादुरुस्त आहेत. फारशा उखडलेल्या आहेत. आवश्यक ती दुरुस्ती ही स्वतः राहणारे करून घेतात. मात्र प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीत बांधकामे करून पोलीस बांधवाना सोयी व सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष महादेव आदमाणे यांनी केली आहे.

बेरोजगारीमुळे युवा पिढीत नैराश्य

अंबाजोगाई :महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प आहेत.त्यामुळे जे कामावर होते ते ही बेरोजगार झाले आहेत. तर अनेकजण नवीन कामाच्या शोधात आहेत. मात्र बाजारपेठेत असणारी आर्थिक मंदी व लॉकडाऊन यामुळे अनेकांना अपयश येत असल्याने तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.

पुन्हा वाढला प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून सगळीकडे कचरा दिसून येत आहे.फळविक्रेते,भाजीविक्रेते,किराणा दुकानदार पुन्हा मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करू लागले आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

पोलीस शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

अंबाजोगाई :शासनाच्या वतीने मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. ते अजूनही पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ करण्यात यावी. त्यामुळे बेरोजगारांना संधी उपलब्ध होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्याण नेहरकर यांनी केली आहे.

Web Title: Pay electricity bill only after taking readings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.