विनाअनुदानित शिक्षकांना वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:23 IST2021-02-19T04:23:18+5:302021-02-19T04:23:18+5:30
बीड : राज्यात अनेक वर्षांपासून ५ वी ते १२ वी विनाअनुदानित शाळा आहेत. या शाळांवर अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांचे ...

विनाअनुदानित शिक्षकांना वेतन द्या
बीड : राज्यात अनेक वर्षांपासून ५ वी ते १२ वी विनाअनुदानित शाळा आहेत. या शाळांवर अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. शासनाने या शिक्षकांना तातडीने वेतन सुरू करावे. गेली अनेक वर्षे आज ना उद्या वेतन सुरू होईल, या आशेवर हे शिक्षक तग धरून आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने वेतन सुरू करावे, अशी मागणी शेकापचे विष्णुपंत घोलप, नारायण थोरवे, राम तांबे, संजय शेळके, राधा पवार यांनी केले आहे.
पाणी उपलब्धतेने रब्बी पिके जोमात
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, इंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्त्रोत तुडुंब भरले. परिणामी रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून, परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसू लागले आहे. यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
युवा सेनेच्या शिबिरात ३४ दात्यांचे रक्तदान
बीड : केज तालुका युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ३४ दात्यांनी रक्तदान केले. शहरातील वकीलवाडी येथील हनुमान मंदिर सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३४ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी अरविंद थोरात, तात्या रोडे, रोहित कसबे, अनिकत शिंदे, संदीप मुळे, किरण साखरे, भरत तुपारे, आदित्य अंधारे, अनिकेत गायकवाड उपस्थित होते.
सुर्डी येथे शेळी पालनाचे प्रशिक्षण
बीड : केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्थेंतर्गत असलेल्या महिला बचतगटातील दोनशे महिलांना संस्थेच्या सुर्डी फाटा (ता.केज) येथील जनविकास प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. जनविकास प्रशिक्षण केंद्रात शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन १५ व १६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. यावेळी लखनौच्या द गोट ट्रस्टचे शिवाजी राऊत, फारूक, दैवशाला लोमटे, संस्था सचिव रमेश भिसे यांनी शेळीपालनविषयक मार्गदर्शन केले.