पकडलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरला पावणेतीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:26+5:302021-07-20T04:23:26+5:30
केज : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टरला तहसीलदारांनी पावणेतीन लाखाचा दंड ठोठावला ...
केज : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने तालुक्यात चोरटी वाळू वाहतूक करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टरला तहसीलदारांनी पावणेतीन लाखाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, तालुक्यातील नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा होत असतानाही स्थानिक प्रशासन कारवाई करत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच जिल्हा खनिकर्म अधिकारी आर्सुळ यांनी १७ जुलै रोजी केज तालुक्यातील बेलगाव येथील नदीपात्रात वाळू भरताना बालासाहेब ज्ञानोबा नाईकवाडे आणि प्रवीण बालासाहेब गायकवाड यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर पथकाने पकडून कार्यवाही केली होती. मुद्देमालासह ते दोन ट्रॅक्टर केज तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्यावर केज तहसीलच्या गौण खनिज विभागाने तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या आदेशानुसार बालासाहेब ज्ञानोबा नाईकवाडे आणि प्रवीण बालासाहेब गायकवाड यांना प्रत्येकी १ लाख ३८ हजार ४०८ रुपये असा एकूण २ लाख ७६ हजार ८१६ रुपये दंड ठोठावला आहे.
190721\1850-img-20210719-wa0010.jpg
नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करताना पकडलेले ट्रॅक्टर