टक्का वाढला; एप्रिलमध्ये ३८३, तर जूनमध्ये ४७३ प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:39+5:302021-07-16T04:23:39+5:30

जिल्हा रुग्णालय : सुविधा व विश्वास वाढल्याने रुग्णसंख्या वाढली बीड : जिल्हा रुग्णालयातील सुविधा व उपचारातील दर्जा आणि विश्वास ...

Percent increased; 383 deliveries in April and 473 deliveries in June | टक्का वाढला; एप्रिलमध्ये ३८३, तर जूनमध्ये ४७३ प्रसूती

टक्का वाढला; एप्रिलमध्ये ३८३, तर जूनमध्ये ४७३ प्रसूती

Next

जिल्हा रुग्णालय : सुविधा व विश्वास वाढल्याने रुग्णसंख्या वाढली

बीड : जिल्हा रुग्णालयातील सुविधा व उपचारातील दर्जा आणि विश्वास वाढल्याने प्रसूतीचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यात ३८३ प्रसूती झाल्या होत्या, तर हाच आकडा जून महिन्यात वाढून ४७३ झाला आहे. यामुळे रुग्णालयाची प्रतिमा उंचावली असून, सामान्यांनाही लाभ होत आहे.

जिल्हा रुग्णालय नेहमीच सुविधा व उपचारांत होणाऱ्या तक्रारींबद्दल चर्चेत असते. रोज नवा वाद व प्रकरण घडत असल्याने रुग्णालयाची प्रतिमा डागाळत होती. त्यातच तत्कालीन अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कसलीच कारवाई होत नसल्याने सामान्यांमध्ये तीव्र रोष होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदाची सूत्रे डॉ. सुरेश साबळे यांनी हाती घेताच शस्त्रक्रिया, प्रसूतीचा टक्का वाढला आहे. सुविधा, उपचार आणि विश्वास वाढविण्यात यश आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात प्रसूतीची संख्या केवळ ३८३ होती. आता ती प्रत्येक महिन्यात वाढत आहे. मे महिन्यात ४१५, तर जूनमध्ये हा आकडा ४७३ वर पोहोचला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे हे अधिकारीही आता स्थलांतरित रुग्णालयात तळ ठोकून नॉनकोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी सूचना करत आहेत.

प्रसूती विभागातील संवादाबद्दल तक्रारी

प्रसूती विभागातील डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांचे काम चांगले आहे. परंतु काही डॉक्टर व परिचारिकांचा रुग्ण व नातेवाईकांशी संवाद हा अतिशय टोकाचा असतो. यामुळे वाद होतात. हा संवाद सुधारून केवळ रुग्णसेवेवर लक्ष देण्याची गरज आहे. वाढत्या तक्रारी कमी करून कामात आणखी सुधारणा झाल्यास सामान्य नागरिक नक्कीच स्वागत करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

---

प्रसूतीचे ३ टेबल वाढविले

जिल्हा रुग्णालयात आगोदर प्रसूती करण्यासाठी केवळ तीनच टेबल होते. त्यामुळे गर्भवतींना प्रतीक्षा करावी लागत होती. एका महिलेची प्रसूती गेटवर झाली. याबाबत नातेवाईकांनी तक्रार करताच आणखी तीन टेबल वाढविण्यात आले. सध्या ६ टेबल व सुरक्षा टेबल अशा ७ टेबलवर महिलांची प्रसूती केली जात आहे.

--

स्थलांतरित व कोरोना रुग्णालयातील सुविधा, उपचाराचा स्वत: आढावा घेत आहे. तसेच एक दिवसाआड राऊंड घेतो. प्रसूती विभागातील काम कौतुकास्पद असून, रुग्णसंख्या वाढल्याने समाधानी आहोत. येथे तीन प्रसूती टेबल आणि खाटाही वाढविल्या आहेत.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

140721\494114_2_bed_11_14072021_14.jpg

डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: Percent increased; 383 deliveries in April and 473 deliveries in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.