पीक नुकसानाचे पंचनामे करा, तलावांची दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:24+5:302021-09-10T04:40:24+5:30

केज : तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच नुकसान झालेल्या गाव तलाव, ...

Perform crop damage inquiries, repair ponds | पीक नुकसानाचे पंचनामे करा, तलावांची दुरूस्ती करा

पीक नुकसानाचे पंचनामे करा, तलावांची दुरूस्ती करा

googlenewsNext

केज : तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच नुकसान झालेल्या गाव तलाव, पाझर तलावांची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिष्टमंडळाने तहसीलदार दुलाजी मेंढके यांना निवेदन दिले. पंचायत समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर, आंगद मुळे, सुनील घोळवे, ॲड. शरद इंगळे, दगडू दळवे, सुरेश नांदे, धनंजय घोळवे, धनराज लाटे, अनिरूद्ध शिंदे, सुशील अंधारे, बाळासाहेब जाधव, लक्ष्मण राख, शेषेराव कसबे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

080921\53071915-img-20210908-wa0041.jpg

नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केज तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार ,सुनील गलांडे सह भजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Perform crop damage inquiries, repair ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.