शैक्षणिक अभ्यासक्रम व शेती मशागतीसाठी दिली मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:56+5:302021-03-26T04:33:56+5:30
बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यात अंशत: बदल करण्यात आला ...
बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यात अंशत: बदल करण्यात आला असून, महाविद्यालय , शालेय, आय टि आय, कृषी महाविदयालय अभियांत्रिकी व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेस व प्रवेशास नियुक्त अधिकारी, कर्मचारी , प्राध्यापक, विद्यार्थी यांना केवळ परीक्षेस व प्रवेशास उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येत आहे. तसेच मशागतीसाठी देखील मुभा देण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे.
विद्यार्थ्यांना व संबंधितांनी सोबत ओळखपत्र ,नियुक्तीपत्र, आधारकार्ड ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व औषधालये २४ तास चालू राहतील. याचबरोबर पूर्वीच्या आदेशात ट्रॅक्टर संपूर्णत: बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले होते. त्यात अंशत: बदल करण्यात आले असून, केवळ शेती मशागतीसाठीच ट्रॅक्टरला मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये शासन नियमाप्रमाणे चालू राहतील. या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार येईल, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.