‘उपळी’तून कुंडलिका नदीत पाणी सोडण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:54+5:302021-04-26T04:30:54+5:30
वडवणी : तालुक्यातील कुप्पा गावासह अन्य १२ गावांत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे १३ शेतीसह पिण्याच्या गावात पिण्याच्या पाण्याची ...
वडवणी : तालुक्यातील कुप्पा गावासह अन्य १२ गावांत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे १३ शेतीसह पिण्याच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामुळे उपळी धरणातून कुंडलिका नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी मंजुरी दिली आहे.
सध्या उपळी धरणात मुबलक पाणी आहे; परंतु कुंडलिका नदीपात्र कोरडे पडले आहे. यामुळे नदीकाठच्या गावात पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच शेतीपिकेही धोक्यात आली आहेत. यामुळे या भागातील ग्रामस्थांनी कुंडलिका नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके व जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे केली होती. याबाबत आमदार साळुंके यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणीटंचाईबाबत वस्तुस्थिती मांडली होती.
या पाणीटंचाईची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ०.५० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच पाणी सुटेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे या गावातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रयत्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.