हुंड्यातील राहिलेल्या पैशांसाठी छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 18:56 IST2021-10-09T18:55:18+5:302021-10-09T18:56:16+5:30
सासरचे मंडळी हुंड्यात राहिलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ

हुंड्यातील राहिलेल्या पैशांसाठी छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन
गेवराई : तालुक्यातील आमला वाहेगाव येथील एका 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी तलवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मनीषा सुधाकर झाडे असे मृत महिलेचे नाव आहे. मनीषाला सासरचे मंडळी हुंड्यात राहिलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करत. सततच्या त्रासाला कंटाळून मनीषाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भीमा बन्सी मांजरे यांच्या फिर्यादीवरून मनीषाचा पती सुधाकर मधूकर झाडे व दिर कल्याण मधुकर झाडे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ माने व पोहेकाॅ श्याम तोंडे हे पुढील तपास करीत आहेत.