फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसाची शिवीगाळ, असभ्य वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:07+5:302021-04-07T04:34:07+5:30
निवेदनात म्हटले की, रामदास आनंद गाडे हा पांढरी येथे शेतातील आष्टी नगर रोडलगत कंपाउंड केलेल्या जागेत असताना विलास नवनाथ ...
निवेदनात म्हटले की, रामदास आनंद गाडे हा पांढरी येथे शेतातील आष्टी नगर रोडलगत कंपाउंड केलेल्या जागेत असताना विलास नवनाथ भोगाडे व लताबाई नवनाथ भोगाडे यांनी लोखंडी पाइपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ देत जिवे मारण्याची धमकी दिली. रामदास आनंद गाडे हे पत्नी व मनोज चौधरी यांच्या साहाय्याने पोलीस स्टेशन आष्टी येथे फिर्याद देण्यासाठी गेले होते. गाडे यांना पोलीस स्टेशनचे अधिकारी भरत उत्तम मोरे यांनी शिवीगाळ केली. मनोज चौधरी यांनी फिर्याद घेणेकामी विनंती केली तेव्हा पोलिसांनी रामदास गाडे यांना शासकीय रुग्णालयात उपचार घेणेकामी पत्र दिले. आष्टी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी रामदास गाडे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी रेफर केले. त्या ठिकाणी रामदास गाडे यांच्यावर उपचार सुरू केले. पोलिसांनी रामदास गाडे यांचा जबाब नोंदवून घेतला व आष्टी पोलीस स्टेशन येथे जबाब पाठविण्यात आला. तरी दोषी विरुद्ध कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत आहे.