पिकांवर कीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:37 AM2021-02-20T05:37:42+5:302021-02-20T05:37:42+5:30
गतिरोधकाची दुर्दशा बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे ...
गतिरोधकाची दुर्दशा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
भिंती रंगलेल्याच
अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात; परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते.
नागरिकांची कसरत
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील पाणंद रस्ते परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. ते दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात आहे.