पेठ बीडमध्ये महिलेचा बतईने चिरला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:09 AM2019-01-20T00:09:01+5:302019-01-20T00:09:38+5:30

पती भिक्षा मागायला बाहेर गेला होता. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करीत ४७ वर्षीय महिलेचा भाजी कापायच्या बतईने गळा चिरून खून केला.

Peth bead slams the woman in the bead | पेठ बीडमध्ये महिलेचा बतईने चिरला गळा

पेठ बीडमध्ये महिलेचा बतईने चिरला गळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पती भिक्षा मागायला बाहेर गेला होता. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करीत ४७ वर्षीय महिलेचा भाजी कापायच्या बतईने गळा चिरून खून केला. ही घटना बीड शहरातील पेठबीड भागातील आयोध्यानगर भागात शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर संबंधित आरोपीने रक्ताने माखलेली बतई बाजूलाच असणाऱ्या एका विहिरीत टाकून पळ काढला. याप्रकरणी शेजारीच राहणाºया अशोक जंगले नामक व्यक्तीवर पेठबीड पोलीस ठाण्यत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिलावती किसन गिरी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिलावती या आपल्या पतीसह घरी राहतात. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा विक्रम यास दत्तक घेतले होते. त्याचे लग्न झाले असून तो सध्या उसतोडण्यासाठी बाहेर जिल्ह्यात गेलेला आहे. त्यामुळे घरात शिलावती आणि पती किसन हे दोघेच राहत होते. शनिवारी सकाळीच किसन गिरी हे भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे शिलावती या घरात एकट्याच होत्या. हीच संधी साधून आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश केला. किचन रूममध्ये जावून तेथीलच भाजी कापायच्या बतईने त्यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आरोपी बिनधास्तपणे बाहेर आला. हातात रक्ताने माखलेली बतई त्याने बाजूच्याच विहिरीत टाकली व नंतर पसार झाला. पोलिसांनी तात्काळ तपासासाठी पथके पाठविले आहेत.
खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यार आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. उशिरापर्यंत खुनाचे कारण समजू शकले नव्हते.

Web Title: Peth bead slams the woman in the bead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.