विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:09+5:302021-07-30T04:35:09+5:30
१) हा बघा फरक ! (दर प्रति लीटर) विमानातील इंधन ए.टी.एफ. - ६७.०० पेट्रोल - १०९ २) शहरातील ...
१) हा बघा फरक ! (दर प्रति लीटर)
विमानातील इंधन ए.टी.एफ. - ६७.००
पेट्रोल - १०९
२) शहरातील पेट्रोल पंप - २०
दररोज लागणारे पेट्रोल - ५०००
३) शहरातील वाहनांची संख्या
दुचाकी - १,२०, ०००
चारचाकी - ८,०००
४) कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी लागतात आठशे
कोरोनामुळे सुरक्षिततेसाठी प्रत्येक जण स्वत:चे वाहन वापरण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. अनेकजण कामासाठी दुचाकी तसेच चारचाकीचा वापर करतात. मात्र, पेट्रोलचे भाव कमालीचे वाढल्याने त्यांना आवश्यक तेथे काटकसर करीत मुरड घालावी लागत आहे. गर्दी टाळायची म्हणून स्वत:चे वाहन घेणाऱ्यांचा खर्च वाहनाचे एव्हरेज व आसन क्षमतेचा विचार केला तर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्के वाढल्याचे दिसून येत आहे.
५) पगार कमी, खर्चात वाढ
मला नोकरीनिमित्त रोज दोन किलोमीटर यावे आणि जावे लागते. त्याशिवाय इतर कामांसाठी शहरात फिरावे लागते. माझ्याकडे दुचाकी आहे. सहा महिन्यांआधी मला महिन्याकाठी ८०० रुपयांचे पेट्रोल लागत होते. मात्र, आता १४०० ते १५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. पगाराच्या तुलनेत खर्च वाढले आहेत.
--- गुंजन कवठेकर, बीड.
----------
माझ्याकडे पेट्राेल कार आहे. आधी मला बरे वाटायचे. मात्र, आता कोणत्याही कामाला नको वाटते. एस. टी. बसने बाहेरगावी गेलो तर गर्दीचा धोका आहेच. तसेच तेथील स्थानिक कामे उरकताना अडचणी येतात व रिक्षा खर्चही सोसावा लागतो. पेट्रोलचे दर वाढले असलेतरी वापराशिवाय पर्याय नाही. - डॉ. एस. पी. लड्डा, बीड.
---------