दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:22 PM2022-04-13T16:22:36+5:302022-04-13T16:22:59+5:30

मृत आणि जखमी सेलू ( जि परभणी) येथील रहिवासी असून पंढरपूरहून गावी परतत असल्याची माहिती आहे. 

Pickup-tractor accident on Dindi road; Two killed on the spot, four seriously injured | दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी

दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी

googlenewsNext

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) :
पंढरपूरच्या एकादशी यात्रेहून परत येणाऱ्या पिकअप टेम्पो ( क्र. एम एच १६-ये वाय-२६०२ ), ट्रॅक्टर व मोटरसायकल ( क्र एम एच ४४आर ७९३६) सोबत तिहेरी अपघात होऊन दोघे जागीच ठार झाले. हा अपघात आज दुपारी ४ शेगाव -पंढपूर या दिंडी मार्गावरील नित्रुडजवळ झाला. नारायण ताठे ( रा.माले टाकळी ता.सेलू ) व केशव चंद्रभान डाके ( ४२ रा.डाके पिंपरी ता.माजलगाव ) अशी मृतांची नावे आहेत. तर अपघातात पंधरा जण जखमी झाले असून त्यातील पाच जण गंभीर आहेत. 

कोरोना काळानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी तिकडे धाव घेतली. मंगळवारी एकादशी असल्याने परभणी जिल्ह्यातील  २३ भाविक पिकअप टेम्पो मधून पंढरपूरला गेले होते. बुधवारी परत येत असताना तेलगाव-माजलगाव दरम्यान असलेल्या नित्रुड टालेवाडीच्या पुलावर पिकअप टेम्पो, ट्रॅक्टर आणि दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. त्यामध्ये मोटर सायकलवरील केशव डाके व टेम्पोमधील नारायण ताठे हे दोघे ठार झाले. 

अपघातात टेम्पोमधील इतर भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रीपती धोंडीराम हूरसुने, पंडित शेषराव ताठे,रा. माली टाकळी तालुका सेलू, श्रीहरी आश्रुबा उगले सिमुरगव्हाण तालुका सेलू,साधू देवराव हेंडगे राहणार करंजी तालुका मानवत, शिवाजी भागूजी वायकर रा. राजे धामणगाव तालुका सेलू हे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

तर युवराज गणेश कृष्णे हा नऊ वर्षाचा मुलगा राहणार राजे धामणगाव , बाबुराव जनार्दन उगले सिमुरगव्हाण, विश्वनाथ श्रीरंग मगर, 65 राहणार खवणे पिंपरी, तालुका सेलू ,पुंजाराम महादेव राऊत 45, राजाराम सखाराम पिंगळकर राहणार धामणगाव तालुका सेलू यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष बडे, डॉ.गजानन रुद्रवार, डॉ. चंदाराणी नरवडे, डॉ. परिक्षित हेलवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले.

यावेळी अपघाताची माहिती समजताच  निञुड येथील गोपाळ कुलकर्णी, शेख आतिक, द्ता गिराम, रामदिप डाके, अजित डाके आदी ग्रामस्थांनी अपघातातील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून मदत केली. तर अपघात होऊन एक तासापेक्षा जास्त कालावधी होऊन ही दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

Web Title: Pickup-tractor accident on Dindi road; Two killed on the spot, four seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.