आमराई, बालेपीर रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:33 AM2021-01-23T04:33:57+5:302021-01-23T04:33:57+5:30
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली ...
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे. परंतु अद्यापही याकडे लक्ष न दिल्याने वाहनधारकांना त्रास सुरूच आहे.
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वागत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे. मास्क हीच खरी कोरोनावरील लस आहे, असेही ते म्हणाले.
सदोष वजनकाट्यांद्वारे ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : चिल्लर व ठोक विक्रीच्या व्यवसायांमध्ये वापरण्यात येत असलेले बरेचसे वजनकाटे सदोष आहेत. परिणामी विक्रेत्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. दुकानदार भाव कमी दर्शवून काटा मारून ग्राहकांची लूट करीत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व ती यंत्रणा वर्षानुवर्षे इकडे फिरकत नाही. त्याचा मोठा गैरफायदा घेऊन व्यापारी ग्राहकांची लूट करीत आहेत. याकडे दुर्लक्ष आहे.