धारूर-आडस रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:29+5:302021-06-06T04:25:29+5:30

धारूर ते अंबाजोगाई या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. माजलगाव, बीडकडून येणारी तसेच अंबाजोगाईला जाणारी वाहने आडसमार्गे जातात. ...

Pits on the Dharur-Adas road | धारूर-आडस रस्त्यावर खड्डेच खड्डे

धारूर-आडस रस्त्यावर खड्डेच खड्डे

googlenewsNext

धारूर ते अंबाजोगाई या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. माजलगाव, बीडकडून येणारी तसेच अंबाजोगाईला जाणारी वाहने आडसमार्गे जातात. परंतु धारूर ते आडस मार्गावर मोठे खड्डे झाल्याने वाहतुकीची मोठी अडचण येत आहे व याकडे बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

धारूर शहरापासून १३ किलोमीटर अंतरावरील आडसकडे जाण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच सध्या खरीप हंगाम असल्यामुळे बीबियाणे खरेदीसाठी जाणाऱ्या, येणाऱ्या शेतकऱ्यांना या खड्ड्यांमुळे मोठी अडचण येत आहे. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने खड्डे भरून घेतले होते. कामाचा दर्जा चांगला नसल्याने पुन्हा खड्डे झाल्याने वाहनधारकांना मोठी अडचण येत आहे. लवकरात लवकर खड्डे भरून नागरिकांची व वाहनधारकांची अडचण दूर करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

किल्ले धारूर शहर व तालुक्यातून महत्त्वाची कामे तसेच दवाखाना, उपचारांसाठी अंबाजोगाईला आडस मार्गे जावे लागते. मात्र जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठी अडचण येत असून यामुळे वाहनांमधील रुग्णाचे मोठे हाल होत आहेत.

===Photopath===

050621\img-20210605-wa0170_14.jpg

Web Title: Pits on the Dharur-Adas road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.