पाईपलाईनसाठी केलेले खड्डे थातूरमातूर बुजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:23+5:302021-07-17T04:26:23+5:30

माजलगाव : शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हनुमान चौक व इतर ठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम ...

The pits made for the pipeline were filled immediately | पाईपलाईनसाठी केलेले खड्डे थातूरमातूर बुजवले

पाईपलाईनसाठी केलेले खड्डे थातूरमातूर बुजवले

Next

माजलगाव

: शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हनुमान चौक व इतर ठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम करून पाईप टाकण्यात आले. परंतु हे खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजवले. या ठिकाणावरून नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

माजलगाव शहरात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पाईपलाईन टाकण्याचे काम थांबले होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी पुढाकार घेऊन शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित ठेकेदाराकडून ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे केले जात आहे. ते खड्डे व्यवस्थित बुजवून त्यावर सिमेंटने लेवल करणे आवश्यक असताना संबंधित गुत्तेदाराकडून पाईपलाईनसाठी खोल खड्डा करण्याऐवजी थातूरमातूर खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे.

ही पाईपलाईन झाल्यानंतर वरून खड्डा व्यवस्थित भरणे आवश्यक असताना व सिमेंटद्वारे रस्त्याबरोबर लेव्हल करून देण्याऐवजी तशीच माती टाकली जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईपलाईन केली तेथे ओटा तयार झाला आहे.

माती तशीच सोडून दिल्याने व अनेक ठिकाणी घरगुती पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी पसरून चिखल होत आहे. शहरात अनेक ठिकाणी असेच चित्र आहे. हनुमान चौकात मागील आठ दिवसांपासून पाईपलाईन खोदकाम करून त्यावर थातूरमातूर माती टाकून दिल्याने येथे चिखल होऊन नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. हनुमान चौकात मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने या ठिकाणाहून नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने येथून जाऊ शकत नसल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. नगरपालिकेकडून संबंधित ठेकेदाराच्या कामाकडे व नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

160721\img_20210708_132235_14.jpg

Web Title: The pits made for the pipeline were filled immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.