नांदूर रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:12+5:302021-05-06T04:36:12+5:30
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून ...
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
गेवराईत चोऱ्या वाढल्या
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांचा बंदोबस्त करून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बीड तालुक्यात विजेचा लपंडाव
बीड : तालुक्यातील नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे हे दिवस असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्व्हर सिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. रिकाम्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे डोह साचल्याने मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत. त्रास रहिवाशांना होत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
पाटोदा : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वृक्षाचे संगोपन व संवर्धन हे निसर्गाची धूप थांबवते. वृक्ष पर्यावरणासाठी आवश्यक आहेत. यामुळे वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी आहे.